संजू परब; ओटवणे येथील श्रीकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनाला उपस्थिती..
⚡ओटवणे दि.०५-: आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या गावातील मंडळाला रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. ओटवणे गावाला आमदार केसरकर यांच्यातर्फे भारघोस निधी देण्यात आला आहे. गावातील कोणतीही विकासकामे असल्यास त्यासंबंधी पत्र माझ्याकडे द्या मी ती पूर्ण करेन असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी उपस्थितांना दिले.
ओटवणे गवळीवाडी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देवस्थानच्यावतीने श्री. परब यांचा सत्कार करण्यात आला तसेच श्री. परब यांनी येथे आयोजित नाट्यप्रयोगाला आर्थिक मदत केली. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, माजगांव जिल्हा परिषद शिवसेना विभाग प्रमुख उमेश गांवकर, बबलू बुराण, गजानन चिले, तुकाराम कोटकर, प्रशांत बुराण, एकनाथ बोरये, बबलू गांवकर, प्रथमेश बोरये, मंगेश चिले, पत्रकार दीपक गावकर आदी उपस्थित होते.
