बांदा: आपल्या गावात सत्कार स्वीकारताना मनात वेगळा आनंद असतो. ओंकार नवयुवक मंडळाने इतर सामाजिक कार्यातही हातभार लावला पाहिजे. लवकरच या मंडळाला रुग्णवाहिका भेट देण्यात येईल. ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याकरिता मी नक्कीच प्रयत्न करीन असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी उपस्थितांना दिले.
यावेळी मडूरा बाबरवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री देव राष्ट्रोळी रंगमंचाचे उद्घाटन श्री. परब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मंडळाच्यावतीने श्री. परब यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुरेश परब, रमाकांत धुरी, भालचंद्र धुरी आदी उपस्थित होते.
