⚡मालवण ता.२९-:
मालवण तालुक्यातील कातवड येथील श्री देव महापुरुष पार, कुदळभाम येथे शुक्रवार दि. २ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दुपारी ३.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून सायंकाळी ७.३० वाजल्यापासून महाप्रसाद, रात्री ८ वाजता स्थानिक भजन, ९ वाजता श्री देव सातपाटेकर दशावतार नाट्यमंडळ निरवडे, सावंतवाडी यांचा ‘शिवकंठभूषण वासुकी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन महापुरुष मित्रमंडळ कुदळभाम, कातवड यांनी केले आहे.
कातवड महापुरुष पार येथे २ रोजी कार्यक्रम…
