अपर पोलीस अधीक्षकांसह आठ अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मान…

१ मे रोजी पालकमंत्री राणेंच्या हस्ते होणार वितरण..

ओरोस ता २९
सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश प्रदीप रावले यांच्यासह जिल्ह्यातील आठ अधिकाऱ्यांना पोलीस दलातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनाच्या १ मे रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार आहे.
राजाच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांनी सोमवारी राज्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा आपल्या सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रासाठी समावेश केला. यात अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद भिकाजी सावंत, दासू मुन्नू पवार, शिवाजी सुरबा सावंत, राजेंद्र गोविंद जामसंडेकर, लीलाधर गणपत राऊळ व पोलीस हवालदार सदानंद पांडू राणे व आरती अरविंद परब यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांना महासंचालकांचे 2024 या वर्षातील सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी खास अभिनंदन केले आहे. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी या सर्व सन्मानचिन्ह प्राप्त गुणवंत पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून राज्याचे मत्स्य व बंदरे विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे हस्ते महाराष्ट्र दिनाच्या १ मे ध्वजारोहण प्रसंगी या सर्वांचा सन्मान केला जाणार आहे.

फोटो:- ऋषिकेश रावले, अरविंद सावंत, दासू पवार, शिवाजी सावंत, राजेंद्र जामसंडेकर, लीलाधर राऊळ, सदानंद राणे, आरती परब

You cannot copy content of this page