जी.टी.एस्. परीक्षेत तनीषा सातार्डेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ल्याची सुकन्या व सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी कु. तनीषा मनीष सातार्डेकर हिने २०२४-२५ या वर्षामध्ये गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जी.टी.एस्. परिक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम तर महाराष्ट्र राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे. कु. तनिषा हिला सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र सर्वच कौतुक होत आहे.
फोटो – तनिषा सातार्डेकर

You cannot copy content of this page