कोळंब येथे नाटेकर आजींचा १२ रोजी पुण्यतिथी सोहळा…

⚡मालवण ता.०७-:
कोळंब येथील श्री संत नाटेकर आजींचा ३० वा तपपूर्ती सोहळा-पुण्यतिथी उत्सव शनिवार दि. १२ एप्रिलला हनुमान जयंती दिनी साजरा होणार आहे.

यानिमित्त सकाळी ८.३० ते १०.३० वाजता दुग्धाभिषेक व लघुरुद्र, १०.३० ते ११.३० वा. श्री विष्णु सहस्त्रनाम व गुरुगीता वाचन, दुपारी १२ ते १२.३० महाआरती, १ वाजल्यापासून महाप्रसाद, १ ते ३ वाजेपर्यंत श्री देव जैन रामेश्वर प्रासादिक दिंडी भजन मंडळ, चुनवरे यांचे भजन, ३ ते ४ वाजेपर्यंत श्री नामदेव महाराज भक्त मंडळाचे वारकरी चक्रीभजन, सायंकाळी ४ ते ५.३० वा. कलावती आई मंडळाचे भजन, ६ ते ८ स्थानिक भजने, रात्री ८ ते ९ श्री देवी घुमडाई प्रासादिक भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन, ९ ते ११ कोळंब न्हिवे कांदळगाव येथील भजन मंडळाचे भजन होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन भालचंद्र शांताराम प्रभूगावकर यांनी केले आहे

You cannot copy content of this page