⚡मालवण ता.०७-:
मालवण तालुक्यातील माळगाव लाटकोंडवाडी (गडकरीवाडी) येथील हनुमान मंदिरात दि. ११ व १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त शुक्रवार ११ एप्रिल रोजी रात्री १० वाजता कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. शनिवारी १२ रोजी पहाटे मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा, आरती व इतर धार्मिक विधी होणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन हनुमान प्रासादिक भजन मंडळ, माळगाव (गडकरीवाडी) यांनी केले आहे.