मतदारसंघातील विक्रमी अपक्षांमागचा किंगमेकर कोण?*
⚡सावंतवाडी ता.०९ -: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे वेगळेपण ठळकपणे जाणवत आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदार संघात अपक्षांचा यावेळी बोलबाला दिसून आला. या परिस्थितीचे नेमके विश्लेषण काय.. यामागे ज्या अदृश्य शक्तीची चर्चा होत आहे ती नेमकी कोणती… सावंतवाडीतील कोणत्या खऱ्या ‘जनशक्ती’ला डावलले गेल्याने महायुतीच्या शक्तीला हा सुरुंग लागला याची चर्चा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.
दरम्यान निवडून आलेल्या या अपक्षांचा “राजा” कोण असणार आहे? हवेचा रुख बदलून टाकणारा “किंगमेकर” आहे तरी कोण? भविष्याच्या या इशाऱ्याचा रोख नेमका कोणाकडे आहे? अशा अनेक प्रश्नांचा जन्म सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बदललेल्या वातावरणामुळे झालेला आहे. सध्या तरी पूछता है सिंधुदुर्ग की… “सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्षांचा राजा” कोण? याची चर्चा आता मतदारसंघात सुरू होणार
