वेंगुर्ल्यात मतमोजणीची तयारी पूर्ण…

⚡वेंगुर्ला ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यासह वेंगुर्ला तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट व 9 पंचायत समिती गण साठी शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न झाली. एकूण 58,785 मतदारापैकी 40, 579 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तालुक्यात एकूण 69 टक्के इतके मतदान झाले आहे. उद्या सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. पासून तहसील कार्यालय येथे 11 टेबलवर मतमोजणी सुरु होणार आहे.
तालुक्यातील पंचायत समिती गणनिहाय प्रत्येक केंद्रावर झालेले मतदान पुढीलप्रमाणे :
म्हापण पंचायत समिती मतदारसंघ : 5826 पैकी 4015 मतदान.
कोचरे – गोपाळराय झिलेप्रभु जिवन शिक्षण केंद्र शाळा कोचरे नं.1 या केंद्रावर एकूण 740 पैकी 546. कोचरे – सरस्वती विद्यालय कोचरे या केंद्रावर एकूण 852 पैकी 555.
मायने -जि. प. प्राथमिक शाळा कोचरे मायना या केंद्रावर एकूण 372 पैकी 280 . म्हापण –
जि.प. केंद्र शाळा म्हापण नं. 1 (पूर्व भाग) या केंद्रावर एकूण 869 पैकी 567. म्हापण – जि.प. केंद्र शाळा म्हापण नं.1 (पश्चिम भाग) या केंद्रावर एकूण 586 पैकी 383. खवणे – जि.प. प्राथमिक शाळा म्हापण मळई या केंद्रावर एकूण 506 पैकी 355. खवणे -पूर्ण प्राथमिक शाळा म्हापण खवणे या केंद्रावर एकूण 702 पैकी 478. केळूस –
नवभारत विद्यालय केळुस नं.1 या केंद्रावर एकूण 691 पैकी 500. केळूस – जि.प. पुर्ण प्राथमिक शाळा केळूस कालवी या केंद्रावर एकूण 508 पैकी 351 असे एकूण 68.92 टक्के मतदान झाले आहे.
परुळे पंचायत समिती मतदारसंघ : 6451 पैकी 4564 मतदान.
परुळे कर्ली –
जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा परुळे कर्लीवाडी या केंद्रावर एकूण 594 पैकी 370. परुळे कालवंड – जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा परुळे कालवंड या केंद्रावर एकूण 279 पैकी 193. परुळे –
जि.प. प्राथमिक शाळा परुळे गवाण या केंद्रावर एकूण 597 पैकी 451.
परुळे – जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा परुळे नं.3 या केंद्रावर एकूण 684 पैकी 468. परुळे चिपी -जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा परुळे चिपी या केंद्रावर एकूण 255 पैकी 173. रावदस – कै. बाळकृष्ण विश्राम प्रभु रावदसकर विद्यालय कुशेवाडा (परुळे) (पूर्व भाग) या केंद्रावर एकूण 912 पैकी 678. रावदस – कै. बाळकृष्ण विश्राम प्रभु रावदसकर विद्यालय कुशेवाडा (परुळे) (पश्चिम भाग) या केंद्रावर एकूण 368 पैकी 261. शेळपी – जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा शेळपी या केंद्रावर एकूण 520 पैकी 410. भोगवे – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा भोगवे नं. 1 या मतदान केंद्रावर एकूण 793 पैकी 532. कोचरे – जि. प. प्राथमिक शाळा श्रीराम विद्यालय कोचरे श्रीरामवाडी या केंद्रावर एकूण 652 पैकी 402. मेढा – प्रताप पंडित स्कुल कोचरा मेढा या मतदान केंद्रावर एकूण 797 पैकी 626 असे मतदान झाले आहे. एकूण 70.75 टक्के मतदान झाले आहे.
आडेली पंचायत समिती मतदारसंघ : 6401 पैकी
4746 मतदान.
वेतोरे – जि.प.प्राथमिक शाळा वेतोरे नं.2 (पूर्व भाग) या केंद्रावर एकूण 737 पैकी 534. वेतोरे जि.प.प्राथमिक शाळा वेतोरे नं.2 (पश्चिम भाग) या केंद्रावर एकूण 596 पैकी 438. आडेली – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. 1 आडेली या केंद्रावर एकूण 758 पैकी 557. आडेली भंडारवाडी – श्री शारदा विद्यामंदिर भंडारवाडी या केंद्रावर एकूण 701 पैकी 519. आडेली – जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा आडेली खुटवळवाडी नं. 2 आडेली या केंद्रावर एकूण 948 पैकी 712. कामळेवीर –
एकात्मिक बालविकास सेवायोजना वेंगुर्ले, अंगणवाडी आडेली- कामळेवीर या केंद्रावर एकूण 490 पैकी 382. मठ – जि.प.पू. प्राथमिक शाळा मठ नं. २ परबवाड़ा या केंद्रावर एकूण 1022 पैकी 755. मठ – कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं. १ या केंद्रावर एकूण 535 पैकी 394.मठ –
कै. रायसाहेब डॉ. रामजी घधोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं. 1 या केंद्रावर एकूण 614 पैकी 455 इतके मतदान झाले आहे.एकूण 74.14 टक्के मतदान झाले आहे.
वायंगणी पंचायत समिती मतदारसंघ : 5903 पैकी 4275 मतदान.
तळेकरवाडी – जि.प. पुर्ण प्राथमिक शाळा वायंगणी सुरंगपाणी (खानोलो) (लगतची इमारत) या केंद्रावर एकूण 625 पैकी 460. खानोली –
जि.प. सिंधुदुर्ग जिवन शिक्षण शाळा खानोली नं. 1 या केंद्रावर एकूण 806 पैकी 596. वेतोरे –
जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेतोरे नं.1 (पूर्व भाग) या केंद्रावर एकूण 735 पैकी 540. वेतोरे –
जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वेतोरे नं. 1.
(पश्चिम भाग) या केंद्रावर एकूण 827 पैकी 626. दाभोली : जि.प. सिंधुदुर्ग पूर्ण प्राथमिक शाळा नं.2 दाभोली खोली नं.१ या केंद्रावर एकूण 678 पैकी 493.. दाभोली –
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दाभोली नं. 1 या केंद्रावर एकूण 522 पैकी 332. दाभोली –
जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा दाभोली नं. 1 या केंद्रावर एकूण 583 पैकी 392.
वायंगणी –
जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वायंगणी नं. 2 या केंद्रावर एकूण 637 पैकी 442 . वायंगणी – श्री देव सिध्देश्वर रवळनाथ प्रसन्न ग्रामपंचायत कार्यालय वायंगणी या केंद्रावर एकूण 490 पैकी 394 इतके मतदान झाले आहे.एकूण 72.42 टक्के मतदान झाले आहे.
तुळस पंचायत समिती मतदारसंघ : 5892 पैकी 4037 मतदान.
वजराट – जिल्हा परिषद सिंधुदुर्ग पुर्ण प्राथमिक शाळा नं.1 वजराट या केंद्रावर एकूण 812 पैकी 553. वजराट पिंपळाचे भरड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वजराट नं. 4 पिंपळाचे भरड या केंद्रावर एकूण 392 पैकी 254. वजराट देवसू –
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शाळा देवसु नं.2 या केंद्रावर एकूण 237 पैकी 177. होडावडा – जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा नं. 2 होडावडा या केंद्रावर एकूण 784 पैकी 501. होडावडा सुभाषवाडी -जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा सुभाषवाडी या केंद्रावर एकूण 501 पैकी 367. तुळस –
श्री रयत शिक्षण संस्थेचे शिवाजी हायस्कूल तुळस या केंद्रावर एकूण 1051 पैकी 752. तुळस –
जि.प. सिंधुदुर्ग श्री जैतिर विद्यालय तुळस (पश्चिम भाग) या केंद्रावर एकूण 1033 पैकी 666. तुळस –
जि.प. सिंधुदुर्ग श्री जैतिर विश्वालय तुळस (पुर्व भाग) या केंद्रावर एकूण 464 पैकी 318. तुळस – श्री वेताळ विद्यामंदिर तुळस या केंद्रावर एकूण 618 पैकी 449 इतके मतदान झाले आहे.एकूण 68.52 टक्के मतदान झाले आहे.
मातोंड पंचायत समिती मतदारसंघ : 5849 पैकी 3898 मतदान.
होडावडा – जि.प. केंद्रशाळा होडावड़े नं. 1 या केंद्रावर एकूण 757 पैकी 564. तुळस – श्री सरस्वती विद्यालय तुळस पलतड या केंद्रावर एकूण 302 पैकी 226. आसोलीपाल – जि.प. सिंधुदुर्ग श्री खाजणादेवी विद्यामंदिर पाल या केंद्रावर एकूण 1095 पैकी 637. मातोंड –
जि.प. पू. प्राथमिक शाळा मातोंड नं. 1 (कार्यालय खोली उत्तर भाग) या केंद्रावर एकूण 678 पैकी 503. मातोंड – जि. प. पू. प्राथमिक शाळा मातोंड नं. (रिकामी वर्ग खोली दक्षिण भाग) या केंद्रावर एकूण 619 पैकी 452. मातोंड –
श्री शारदा विद्यामंदिर मातोंड बांबर क्र.5 (उत्तर भाग) या केंद्रावर एकूण 960 पैकी 608. मातोंड पेंडूर – श्री कुलदेवता विद्यामंदिर जि.प. पुर्ण प्राथमिक शाळा पेंडूर पेंढ-याचीवाडी या केंद्रावर एकूण 1084 पैकी 669. सातवायंगणी -जि.प. मातोंड सातवायंगणी शाळा क्र.4 या केंद्रावर एकूण 354 पैकी 239 इतके मतदान झाले आहे.एकूण 66.64 टक्के मतदान झाले आहे.
उभादांडा पंचायत समिती मतदारसंघ : 5606 पैकी 3640 मतदान.
परबवाडा -जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा परबवाडा नं. 1 या केंद्रावर एकूण 1044 पैकी 730. आडारी – जि.प. प्राथमिक शाळा उभादांडा भेंडमळा (दक्षिण भाग) या केंद्रावर एकूण 1033 पैकी 682. उभादांडा – जि.प. सिंधुदुर्ग पूर्ण प्राथमिक शाळा उभादांडा नवाबाग या केंद्रावर एकूण 519 पैकी 340. उभादांडा –
जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा बागायत उभादांडा पूर्व भाग या केंद्रावर एकूण 633 पैकी 411. उभादांडा –
केंद्रशाळा उभादांडा नं.1 या केंद्रावर एकूण 919 पैकी 515. आडारी –
जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा नं. 2 उभादांडा या केंद्रावर एकूण 888 पैकी 589. आडारी -जि.प. पुर्ण प्राथमिक शाळा उभादांडा नं. 3 (पूर्व भाग) या केंद्रावर एकूण 570 पैकी 373 इतके मतदान झाले आहे.एकूण 64.93 टक्के मतदान झाले आहे.
आसोली पंचायत समिती मतदारसंघ : 5631 पैकी 3668 मतदान.
आडारी – जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा उभादांडा नं. 3 (पश्चिम भाग) या केंद्रावर एकूण 849 पैकी 522. मोचेमाड –
जि.प. पुर्ण प्राथमिक शाळा मोचेमाड या केंद्रावर एकूण 774 पैकी 537. अणसूर –
जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वरचे अणसूर या केंद्रावर एकूण 769 पैकी 547. आसोली -आसोली न्हचीआड जि.प. प्रायमरी शाळा या केंद्रावर एकूण 404 पैकी 297. आसोली –
श्री देव नारायण विद्यामंदिर पूर्ण प्राथमिक शाळा आसोली नं.1 (दक्षिण भाग) या केंद्रावर एकूण 786 पैकी 515. आसोली –
श्री देव नारायण विद्यामंदिर पूर्ण प्राथमिक शाळा आसोली नं.1 (पुर्व भाग) या केंद्रावर एकूण 923 पैकी 622. आरवली

  • जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा आरवली टाक या केंद्रावर एकूण 760 पैकी 415. आरवली टाक –
    सरस्वती विद्यालय आरवली टाक पश्चिम भाग या केंद्रावर एकूण 366 पैकी 213 इतके मतदान झाले आहे. एकूण 65.14 टक्के मतदान झाले आहे.
    रेडी पंचायत समिती मतदारसंघ : 6074 पैकी 4294 मतदान.
    शिरोडा – जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा केरवाडा शिरोडा (उत्तर भाग) या केंद्रावर एकूण 668 पैकी 554. शिरोडा – जि.प. पुर्ण प्राथमिक शाळा केरवाडा शिरोडा (दक्षिण भाग) या केंद्रावर एकूण 959 पैकी 742. हुडा-
    श्री सत्यपुरुष विद्यामंदिर रेडी हुडावाडी या केंद्रावर एकूण 818 पैकी 556. रेडी – जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा सुकळभाट नं.2 (दक्षिण भाग) या केंद्रावर एकूण 641 पैकी 460. रेडी -जि.प. पुर्ण प्राथमिक शाळा सुकळभाट नं.2 (उत्तर भाग) या केंद्रावर एकूण 596 पैकी 387. रेडी -सेंट्रल प्रायमरी स्कुल रेडी नं.1 (पूर्व भाग) या केंद्रावर एकूण 911 पैकी 566. रेडी –
    सेंट्रल प्रायमरी स्कुल रेडी नं.1 (पश्चिम भाग) या केंद्रावर एकूण 388 पैकी 272. कनयाळ –
    जि.प. प्राथमिक शाळा रेडी कनयाळ या केंद्रावर एकूण 576 पैकी 355. गावतळे – जि.प. प्राथमिक शाळा रेडी गावतळे या केंद्रावर एकूण 517 पैकी 402 इतके मतदान झाले आहे.एकूण 70.69 टक्के मतदान झाले आहे.
    शिरोडा पंचायत समिती मतदारसंघ : 5152 पैकी 3442 मतदान.
    आरवली टाक – सरस्वती विद्यालय आरवली टाक पूर्व भाग या केंद्रावर एकूण 626 पैकी 331. आरवली – जिवन शिक्षण शाळा आरवली नं. 1 (पुर्व भाग) या केंद्रावर एकूण 400 पैकी 317. आरवली – जीवन शिक्षण शाळा आरवली नं.1 (पश्चिम भाग) या केंद्रावर एकूण 678 पैकी 465. आरवली सोन्सुरे – पूर्ण प्राथमिक मराठी शाळा आरवली सोन्सुरे या केंद्रावर एकूण 614 पैकी 398. शिरोडा –
    जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा खर्डेवाडी शिरोडा या केंद्रावर एकूण 628 पैकी 372. शिरोडा -सेंट्रल प्रायमरी स्कूल शिरोडा नं. 1 या केंद्रावर एकूण 916 पैकी 588. शिरोडा – गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा या केंद्रावर एकूण 738 पैकी 535. शिरोडा –
    जि.प. प्राथमिक शाळा शिरोडा गावडेवाडी या केंद्रावर एकूण 552 पैकी 436 इतके मतदान झाले आहे.एकूण 66.81 टक्के मतदान झाले आहे.
You cannot copy content of this page