कुडाळात मतमोजणीची तयारी पूर्ण…

१८ टेबल्स, ११ फेऱ्या:प्रशासकीय यंत्रणा सज्ज..

कुडाळ : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. या ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कुडाळ तहसील कार्यालय सज्ज झाले असून, सकाळी १० वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत ऐश्वर्या काळुसे यांनी मतमोजणीच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. असे
सकाळी १० वाजता प्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी होईल. त्यानंतर १०.३० वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान यंत्रांमधील (EVM) मतांची मोजणी सुरू केली जाईल. मतमोजणीसाठी एकूण १८ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय ही संपूर्ण प्रक्रिया एकूण ११ फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक टेबलवर १ झोनल अधिकारी आणि १ ग्राम महसूल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते प्रत्यक्षात गणांची मतमोजणी करणार आहेत.
मतमोजणीचा श्रीगणेशा आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघातून होणार आहे.

You cannot copy content of this page