मुले-पालकांमध्ये मोबाईलचा वाढता वापर धोकादायक…

अनिल पाटील:पिंगुळीत ग्रा प आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ..

⚡कुडाळ ता.०७-: आपण जसं वागाल तसंच मुलं वागतील, परंतु आपण मुलांना काय देतोय यांची काळजी घेणे आवश्यक आहे. भारतीय लोक रोज पाच तास रिल्स बघत आहेत ही धोक्याची बाब आहे. आता पुस्तकाचा संवाद कमी झाला आहे. मोबाईल हा एकांत पणा घालवण्यासाठीचे एक साधन आहे. सण, परंपरा का साजरे करतोय हे आपण मुलांना सांगितले पाहिजे. शिक्षकापेक्षा पालकांसोबत मुलं अधिक असतात.जेवताना मोबाईल, टिव्ही टाळलाच पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत पिंगुळी ग्रामपंचायत आपल्या दारी आयोजित कार्यक्रमात आज केले.
     ग्रामपंचायत पिंगुळी आयोजित ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमांचा  शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत परमपूज्य सद्गुरु समर्थ राऊळ महाराज सभागृह पिंगुळी येथे करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , पिंगुळी सरपंच अजय आकेरकर,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, राऊळ महाराज संस्थानचे उपाध्यक्ष दशरथ राऊळ, शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी सुलभा ठाकुर, विकास कुडाळकर, संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्य डॉ स्मिता सुरवसे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, ज्येष्ठ साहित्यिक भरत गावडे, प्रा रुपेश पाटील, साहित्यिक वृंदा कांबळी, सौ जयश्री चिलवंत, वर्षा कुडाळकर, सागर रणसिंग, मंगेश चव्हाण, मंगेश मसके, अनवी बांदेकर, शशांक पिंगुळकर, केशव पिंगुळकर, सौ. ममता  राऊळ, सौ. अश्विनी गंगावणे,
सौ. अंकिता  जाधव, नूतन गावडे, ग्रामसेवक राजेश निवतकर, राजन पांचाळ, प्रसाद दळवी, आप्पा सावंत, तसेच परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, प पू विनायक अण्णा राऊळ महाराज सेवा ट्रस्ट गावातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक वृंद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, वृद्ध, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, गावातील ग्रामस्थ, गावातील सर्व ग्रंथालयांचे अध्यक्ष, प्रतिनिधी महिला बचत गट यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.प्रभाकर सावंत म्हणाले की, पालकांनी मुलांना मोबाईल घेवू नका हे सांगताना काय घ्या हे ही सांगावे. पालकांनी मुलांशी मित्राप्रमाणे वागावे. श्री.अग्रवाल म्हणाले की, आजच्या कार्यक्रमात घेतलेला परिसंवाद मधील विषय निश्चितच कौतुकास्पद आहे. मुलासोबत पालकांना ही चांगला आहे. रणजित देसाई म्हणाले की, पिंगुळी ग्रामपंचायतचा उपक्रम चांगला आहे. आजची मुले  मोबाईलच्या विळख्यात न राहता पालक व शिक्षकाच्या माध्यमातून आपले हरवलेले बालपण पुन्हा आणण्यासाठी मैदानी खेळाकडे वळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे सांगितले. श्री.वसावे म्हणाले की, पालकांची जबाबदारी जास्त आहे. पालकच हे मुलांचे पहिले गुरु आहेत. पालकांनी मुलांकडे मोबाईल न देण्याचा निर्णय घेतला पाहिजे. मोबाईल मुळे मुलांची नवनिर्मीतीची क्षमता कमी झाली आहे. आजचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे श्री.वसावे यांनी सांगितले.
यावेळी पिंगुळी मधील सर्व शाळांच्या व्यवस्थापन समिती , मुख्याध्यापक व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्री देव महापुरुष वाचनालय व
ग्रंथालय,शेटकरवाडी व श्री देवी भद्रकाली वाचनालय व; ग्रंथसंग्रहालय,गुढीपूर पिंगुळी श्री देव रवळनाथ वाचनालय, कै मधु दंडवते वाचनालय याना ग्रा प तर्फे अनुदान वाटप करण्यात आले. आमदार निलेश राणे यांचा मुंबई दौरा असल्याने ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी पिंगुळी ग्रामपंचायतच्या या स्तुत्य उपक्रमास भ्रमण ध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक शंशाक पिंगुळकर, सुत्रसंचलन राजन पांचाळ व मंगेश मसके यांनी केले. सुरुवातीला जिल्हा परिषद शाळा गोंधयाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले तर पिंगुळी शेटकरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. आभार स्वरा काळसेकर यांनी मानले पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

You cannot copy content of this page