कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ एप्रिल रोजी…

⚡कणकवली ता.०४-: कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची आरक्षण सोडत मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वा कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे.

तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असणार असून त्यात दोन संबंधित प्रवर्गासाठी व तीन महिलांसाठी आरक्षणीत असणार आहे. नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी १७ पदे आरक्षीत होणार असून त्यात ८ प्रवर्गासाठी व ९ महिलांसाठी असणार आहेत. तर उर्वरीत ४२ सरपंच पदे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार असून त्यात २१ पदे ही सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षीत होणार आहेत.

तरी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी जि.प., पं.स. सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page