Headlines

अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी 13 लाखाचा मुद्देमाल जप्त…

⚡बांदा ता.०३-: गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि इन्सुली तपासणी नाका पथकाने बांदा ओटवणे रस्त्यावर सुभेदार हॉटेल जवळ बुधवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत ६लाख 83 हजार 640 रुपयांची दारू, ६ लाख रुपयांची महिंद्रा बोलेरो पिकअप ,अंदाजे 20,हजार रुपयाचे भाजीचे रिकामी कॅरेट असा एकूण 13 लाख 3 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मालक शंकर दत्तात्रय मस्के (43) आणि वाहन चालक सचिन शिवाजी वाघमारे (27) रा- बोरामणी , जि सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

You cannot copy content of this page