दांडी येथे श्री देव गोपालकृष्ण वर्धापन दिन सोहळा…

⚡मालवण ता.०२-:
मालवण दांडी येथील श्री देव श्रीकृष्ण मंदिर पंचायतन संस्थान, चौकचार मांड या ठिकाणी श्री देव गोपालकृष्णाचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त दि. ०३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता दांडी वायरी गावातून पालखी मिरवणूक, दि. ४ एप्रिल रोजी सकाळी मूर्ती अभिषेक, होम, सत्यनारायण महापूजा दुपारी १२.१५ वा., आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी संगीत भजने, रात्री १० वाजता दशावतारी नाटक, दि. ५ रोजी रात्री १० वा. मोरेश्वरवाडी आयोजित दशावतारी नाटक, दि. ६ रोजी दांडी वायरी गावातील हौशी कलाकारांचे रेकॉर्ड डान्स सादर होणार आहेत. अधिक माहितीसाठी आबा आडकर ९४०५७२५३५० यांच्याशी संपर्क साधावा. दि.७ रोजी ‘ट्रीकसीन’ दशावतारी नाटक रात्री १० वाजता दांडेश्वरवाडी आयोजित दशावतारी नाटक सादर होणार आहे.

तरी मालवणवायीयांनी तसेच दांडी वायरी गांवातील सर्व ग्रामस्थ, महिला यांनी कार्यक्रमांस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन दांडी गांव कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page