⚡मालवण ता.०२-:
अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्था, मालवण यांच्यावतीने दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डॉ. केरकर व्हीला, तारकर्ली-मालवण येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.
या शिबिरात संपूर्ण शारीरिक तपासणी, अॅक्युप्रेशर व फिजीओथेरेपी उपचार हे संगणकीय अॅटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये इसीजी तपासणी, हृदय व मेंदूच्या रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता व हिमोग्लोबीन आणि ब्लडप्रेशर, त्वचेची तपासणी, पचनसंस्थेची कार्यक्षमता, लिव्हर कार्यक्षमता, फुप्फुसाची तपासणी, मेंदूच्या रक्तवाहिन्यांची तपासणी, हाडांचे विकार, हाडांचे आरोग्य, लठ्ठपणा, कानाची तपासणी, ब्लडशुगर, मिनरल, जीवनसत्त्व, अॅमिना अॅसिड, बेसिक फिजिकल क्वॉलिटी, मुत्रपिंड, रोगप्रतिकारक प्रणाली, रक्तातील हेवीमेटल, डोळ्यांचे आरोग्य, अॅलर्जी, त्वचा व शरीररचना, रक्तातील चरबीचे प्रमाण, आतड्यांचे आरोग्य, थायरॉईड कार्यक्षमता, पल्स ऑक्सीमीटर, पित्ताशय, स्वादूपिंड, पुरुषांकरिता प्रोस्टेट, मासिक पाळीबाबत मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. अधिक माहितीसाठी सौ. स्नेहा केरकर ८७८८०९५८६०, डॉ. जितेंद्र केरकर, संध्या गोवेकर, संध्या वायंगणकर, वेदा देऊळकर, हरिहर वालावलकर, नादार तुळसकर, आशा लोरेंस वळपी, फिलसू फर्नांडीस, मोरेश्वर धुरी, स्नेहा पेडणेकर, सुहास पराडकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
