आंबोली पोलिसांविरोधातील ठिय्या पोलीस निरीक्षकांच्या आश्वासनाने स्थगित…

आंबोली,ता.२३: चार चाकी बलेनो गाडी ने ठोकून जायबंदी झालेल्या महिलेला आणि जखमी झालेल्या मुलाला अपघात झाल्याप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी आंबोली पोलीस स्थानकासमोर आज ११ वाजलेपासून नातेवाईक व ग्रामस्थ यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते.सकाळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी या ठिकाणी भेट दिली.तसेच आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी योग्य रीतीने संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात येईल. गाडी चालकाने हयगयीने हा प्रकार केलेला आहे.सध्या महिला जायबंदी झाली आहे तिच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे दोषीवर योग्य ती कलमे लागली पाहिजेत.मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या चालक व अन्य या सर्वावर कारवाई करावी.ते गोव्यात कॅसिनो साठी जात होते. चुरणीची मुस येथील अपघात ग्रस्थांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी योग्य पद्धतीने तपास करून सर्व सहकार्य करण्याचे अवश्वासन दिले. यावेळी हवालदार दीपक शिंदे,मनीष शिंदे,अभिजित कांबळे,राजेश नाईक,महेंद्र मातोंडकर पोलिस् उपस्थित होते.तर आंदोलकांसोबत महेश नार्वेकर,सचिन नार्वेकर,उबाठा चे विभाग अध्यक्ष बबन गावडे,हेमंत कर्पे,गणपत पाटील, गेळे सरपंच सागर ढोकरे, सुनील चव्हाण, काशीराम राऊत, अमोल कर्पे,गजानन कर्पे,रुपेश गावडे,काशीराम गावडे,विशाल बांदेकर,अतुल बांदेकर,अरुण चव्हाण,संदीप गावडे, जीजी राऊत,चौकुळ चे समाजिक कार्यकर्ते मनोहर गावडे,नंदू गावडे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.आश्वासनांती दुपारी ग्रामस्थांनी अदोलन स्थगित केले.

You cannot copy content of this page