⚡बांदा ता.२३-: द बांदेश्वर फिटनेस क्लब बांदा आणि महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स आणि सिंधुदुर्ग बॉडीबिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने याठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मानाची “सिंधुदुर्ग श्री २०२५” या बॉडीबील्डिंग स्पर्धेत ठाणे येथील पुरुषोत्तम एरनाक हा ‘सिंधुदुर्ग श्री’चा मानकरी ठरला. सिंधुदुर्गचा रामदास राऊळ हा मोस्ट इंप्रूव्ह बॉडीबिल्डर ठरला तसेच बेस्ट पोझर चा मानकरी वैभव वेंगुर्लेकर ठरला.
ही स्पर्धा ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो आणि ७५ किलोवरील वजनी गटात भरवीण्यात आली होती. संपूर्ण स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे
५५ किलो वजनी गट- (प्रथम पाच क्रमांकानुसार). प्रणय चोरगे, पराग बोन्द्रे, आदित्य शिवलकर, उदय जाधव, भूषण गवंडी.
६० किलो वजनी गट – विपुल करलकर, शेरबहादूर बोगटी, मेहुल पाटील, तेजस परब, रणजित जाधव.
६५ किलो वजनी गट – अदनान करोल, आग्नेल डिसोजा, सागर कलप, वेदांत केरकर, हर्षद मडवकर.
७० किलो वजनी गट – पुरुषोत्तम एरनाक, संकेत दादगोळ, सागर लाटम, अभिनंदन साटोपे, वैभव वेंगुर्लेकर.
७५ किलो वजनी गट – रामदास राऊळ, देवेश लाड, सुमित जाधव, अक्षय माने, महादेव पाणदरे.
७५ किलोवरील वजनी गट – अक्षय गायकवाड, योगेश वायंगणकर, किरण पाटील, नितीन चवरिया, सोहम पांचाळ.
मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. आभार संदेश सावंत यांनी मानले.
पुरुषोत्तम एरनाक हा ‘सिंधुदुर्ग श्री’चा मानकरी ठरला…
