वैभववाडी प्रतिनिधी
कोकिसरे रेल्वे फाटका नजिक रेल्वे ट्रॅकवर मध्यप्रदेशातील मुकेश कुमार मुन्नालाल कोल वय वर्ष 28 सध्या कम करण्याचे ठिकाण भैरीभवानी सिमेंट गोदाम घंगाळवाडी कोकिसरे या तरुणाचा मृतदेह सापडून आला हा प्रकार शुक्रवारी रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास झाला त्याला रेल्वेची धडक बसली की त्याने आत्महत्या केली याबाबत कोणती माहिती समजू शकली नाही.
मुकेश कुमार हा भैरी भवानी सिमेंट गोदाम मध्ये काम करीत होता शुक्रवारी रात्री तो काम करीत असलेल्या ठिकाणावरून गायब झाला दरम्यान रात्री रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना एका अज्ञात मृतदेह रेल्वे ट्रॅकवर दिसून आला रेल्वे सुरक्षा बल चे अधिकारी दुर्गेश प्रसाद यादव यांनी ही माहिती वैभवाडी पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल पोलीस कर्मचारी हरेश जायभाय अजय बिलपे आदींनी घटनास्थळी जाऊन त्यांना रेल्वे फाटकापासून काही अंतरावर मृतदेह आढळून आला त्या मृतदेहाकडे आधार कार्ड वरून त्याची ओळख पटली. अधिक तपास महिला पोलीस प्रमिला शिंगाडे करत आहे.
कोकिसरे रेल्वे फाटकानजीक रेल्वे ट्रकवर आढळला तरुणाचा मृतदेह…
