संजू परब; सह्याद्री फाउंडेशन संजू परब मित्र मंडळ व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन..
⚡सावंतवाडी ता.१५-: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेशजी राणे यांचा वाढदिवस १७ मार्च रोजी असून, सध्या सुरू असलेल्या मुंबई अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वाढदिवस १६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ३:३० वाजता सावंतवाडीत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संजू परब यांनी आज येथे दिली
संजु परब मित्रमंडळ, सह्याद्री फाउंडेशन आणि शिवसेना सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष सोहळ्याचे आयोजन हॉटेल मँगोच्या भव्य बॅनक्वेट हॉलमध्ये करण्यात आले आहे. या सोहळ्यास निलेशजी राणे स्वतः उपस्थित राहणार असून, केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
या निमित्ताने संजु परब मित्रमंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच निलेशजी राणे साहेबांचे असंख्य अनुयायी आणि हितचिंतकांनी या भव्य सोहळ्याला उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्यावर प्रेमाचा वर्षाव करावा.
हा सोहळा केवळ एक वाढदिवस नसून, जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेल्या नेत्यावरील अपार प्रेम आणि एकजूट याचे प्रतीक ठरणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा ऐतिहासिक क्षण साक्षीभावे अनुभवावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.
