⚡मालवण ता.१०-: मालवण मेढा येथील किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॉलरला रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आगल्याची घटना घडली. किनाऱ्यावरील वाऱ्याने ही आग आणखी भडकल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण बनले होते . यावेळी स्थानिक नागरिक, मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकानी धाव घेत अग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. तसेच यां ट्रॉलरच्या बाजूला उभ्या असलेल्या इतर नौका तातडीने बाजूला हलवत सुरक्षित स्थळी ठेवल्या. यावेळी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचरण करण्याट आले मात्र याठिकाणी बंब येण्यासाठी योग्य असा एकमेव मार्ग असलेल्या बंदर जेटी रस्त्याचे काम सुरु असल्याने बंब घटनास्थळी येऊ शकला नाही. यावेळी फायरफायटर बाईक घटनास्थळी दाखल होऊन त्याद्वारे आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. काही वेळाने अग्नीशमन घटनास्थळापासून जवळ असलेल्या रस्त्यापर्यंत आला, मात्र तेथून जळत्या ट्रॉलरपर्यंत बंबाचा पाईप पोहचू ण शकल्याने बंबाचा उपयोग झाला नाही.
मालवण मेढा येथील किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॉलरला लागली अचनाक आग…
