डांगमोडे येथील रवळनाथ मंदिरात भवानी मातेचा गोंधळ हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न !

⚡मालवण ता.०९-:
मसुरे डांगमोडे येथील श्री रवळनाथ मंदिर येथे भवानी मातेचा वार्षिक गोंधळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी विधिवत पूजन झाल्या नंतर रात्री ओट्या भरण्यास प्रारंभ झाला. मुंबईकर चाकरमानी तसेच माहेरवाशिणींनी मोठ्या प्रमाणात यावेळी गर्दी केली

होती.उत्सवानिमीत्त श्री देव रवळनाथाची मूर्ती आकर्षक अशा वस्त्रालंकारानी सजवण्यात आली होती.
दारूबंदीचा पुरस्कर्ता असणारा आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवास सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच मुंबई, पूणे ,कोल्हापूर येथील भाविक उपस्थित होते. सकाळी श्री देव रवळनाथ विधिवत पूजा अर्चा तर रात्रौ दहा नंतर श्री भवानी मातेच्या गोंधळ उत्सवास सुरुवात झाली. यावेळी श्री भवानी मातेचा मांड, देवदेवतांच्या तरंग मिरवणूक तसेच भवानी मातेची खणा नारळाने ओटी भरणे व इतर कार्यक्रम भाविकांच्या अपूर्व उत्साहात संपन्न झाले. माहेरवाशीण महिलांनी ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी यावेळी केली होती. यानिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई, फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवस्थान विश्वस्त,नवतरुण मित्र मंडळ सर्व सदस्य, ग्रामस्थ यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page