मालवण ता.०९-: सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित प्रयोगात्मक कला शिबिर दशावतार प्रशिक्षण डोंबिवली येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचे उदघाट्न लोकसेवा समीती अध्यक्ष रामचंद्र ,(बाळा) परब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जेष्ठ भजनी बुवा प्रकाश चिले, पखवाज वादक दत्तगुरु गोसावी, जेष्ठ दशावतारी कलावंत आप्पा चव्हाण, भगवती दशावतार मंडळ मुणगे – मुंबई मालक प्रकाश लब्दे, शिबिर संचालक श्री दाजी (समीर ) नार्वेकर तसेच श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ डोंबिवली सर्व कलाकार, नविन विध्यार्थी, आणि दशावतारी प्रेमी उपस्थित होते. ही दशावतारी कला नविन विध्यार्थी कलाकार घडावे या उद्देशाने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालयाने दशावतारी कलेवर प्रेम करुन हा आगळावेगळा उपक्रम प्रथमच डोंबिवली येथे चालु केला आहे. दहा दिवस सदर शिबीर ८मार्च ते१८ मार्च या कालावधीत होणार आहे. तरी या शिबिरात नवीन कलाकारानी सुद्धा सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाश पांडुरंग लब्दे आणि दाजी (समीर) नार्वेकर तसेच भगवती दशावतार नाट्य मंडळ डोंबिवली यांनी केले आहे.
