⚡कुडाळ ता.०६-: तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडीत येथील संदीप करलकर खून प्रकरणी रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (४०) व शैलेश दत्ताराम करलकर (४३) या दोन सख्या भावांसह कामगार शामसुंदर वाड्येकर याला गुरुवारी कुडाळ न्यायालयासमोर हजर केले असता १५ दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तिन्ही आरोपीची आज पोलीस कस्टडी संपली होती. तपासात नवीन मुद्दा नाही असे तयासीक अंमलदार श्री गायकवाड यांनी सांगून तपास सुरु असल्याचे सांगितले.
संदिप करलकरच्या खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून निवती पोलिसांनी तिघांना अटक केली होती. कवठी येथील दादा करलकर यांच्या काजूच्या बागेत जाऊन संदिप करलकर याने काजू चोरले आणि वडिलांना व कामगाराला धमकावले होते ,यांचा राग मनात ठेवून दादा करलकर व शैलेश करलकर या बंधूंनी आपल्या कामगाराला सोबत घेत संदिप करलकर याला घरी जाऊन जाब विचारला. यावेळी झालेल्या झटापटीत संदीप करलकर याला जबर मारहाण केली होती. त्यानंतर संदीप करलकरचा मृत्यू झाला होता. याबाबतची फिर्याद संदीप करलकर याचा भाऊ संतोष करलकर याने निवती पोलिस स्थानकात दिली होती. त्यानुसार निवती पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. निवती पोलीस ठाण्याचे अधिकारी भीमसेन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास करीत शामसुंदर वाडयेकर, रामचंद्र उर्फ दादा करलकर व शैलेश करलकर याना संशयित म्हणून ताब्यात घेत अटक केली होती
कुडाळ न्यायालयाने सुरुवातीला संशयीत श्यामसुंदर वाडयेकर याला ६ मार्च पर्यंत आणि नंतर रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर व शैलेश दत्ताराम करलकर या दोन सख्या भावांना देखील सहा मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना आज कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले.
संतोष करलकर खून प्रकरणी संशयितांना न्यायालयीन कोठडी…
