नेरूर-साईगाव येथे मादी बिबट्या मृतावस्थेत…

मृत्यूचे नेमके कारण गुलदस्त्यात..

कुडाळ : तालुक्यातील नेरूर तर्फ हवेली मध्ये साईगाव येथे मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला. साईगांव येथील रहिवासी सुर्यकांत भिकाजी कुंभार यांनी याबाबत वन विभागाला खबर दिल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी जात पाहणी केली. बिबट्याचे शव आकेरी येथील वनविश्रामगृह येथे आणून त्याचे पशुवैदयकिय अधिकारी कुडाळ यांच्या मार्फत शिविच्छेदन करून त्याचे दहन करण्यात आले. दरम्यान मृत्युचे नेमके कारण समजणेकरिता सदर मृत बिबट मादीच्या अवयवांचे नमुने घेण्यात आलेले आहेत ते न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविण्यात येणार
याबाबत वनविभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,दि. ६ मार्च २००५ रोजी परिमंडळ नेरुर त. हवेली कडील नियतक्षेत्र नेरुर त. हवेली मधील मौजे साईगांव येथील रहिवासी सुर्यकांत भिकाजी कुंभार, रा. साईगांव यांनी वनपाल नेरुर त. हवेली यांना भ्रमणध्वनीवर बिबट मृत झाल्याची बातमी दिली. त्यानुसार वनपाल नेरुर त. हवेली यांनी सदर घटनेबाबतची माहिती वनक्षेत्रपाल कुडाळ यांना दिली. त्याप्रमाणे सहा. वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी व वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी वनपाल नेरुर त. हवेली व वनरक्षक नेरुर त. हवेली यांचे समवेत जागेवर जाऊन पाहाणी केली असता, वन्यप्राणी बिबट मृत झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पशुवैदयकिय अधिकारी कुडाळ यांना बोलाविणेत आले. पशुवैदयकिय अधिकारी कुडाळ यांनी सदर मृत बिबट्याचे पाहाणी केली असता, सदर बिबट हा मादी असून त्याचे अंदाजे वय 4 ते 5 वर्षे असल्याचे सांगितले.
सदर ठिकाणी आजु बाजूच्या परिसराची पाहाणी करुन व चौकशी करुन, खात्री करुन पंचनामादी कागदपत्रे तयार केली आहेत. त्यांनतर मृत बिबट्याचे शव मौजे आकेरी येथील वनविश्रामगृह येथे आणून त्याचे पशुवैदयकिय अधिकारी कुडाळ यांचेमार्फत उप-वनसंरक्षक सावंतवाडी, सहा. वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी व वन अधिकारी/कमर्चारी यांचे समक्ष शवविच्छेदन करुन दहन करण्यात आले. शवविच्छेदन करताना मृत्युचे नेमके कारण समजणेकरिता सदर मृत बिबट मादीच्या अवयवांचे नमुने घेण्यात आलेले आहेत ते न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविण्यात येणार असून, सदर घटनेबाबत वनपाल नेरुर त. हवेली यांचेकडील प्रथम गुन्हा रिपोर्ट वप्रार 02/2025 चा गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास उप-वनसंरक्षक सावंतवाडी व सहा. वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली चालू आहे.

You cannot copy content of this page