शाखा प्रमुख कवठणकर यांचा जी प सदस्यांवर आरोप
सावंतवाडी-: कवठणी गावचे सरपंच गावच्या विकासासाठी करत असलेल्या कामांना जिल्हा परिषद सदस्य सहकार्य करत नसून, गावची इब्रत चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप कवठ्णी शिवसेना शाखा प्रमुख यामेश्र्वर कवठणकर यांनी जिल्हा परिषद सदस्यावर केला आहे. सरपंचांना सहकार्य न करता जिल्हा परिषद सदस्य घेत असलेली आडमुठेपणाची भूमिका योग्य आहे का? याच साठी तुम्हाला निवडून दिले का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
