दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी
*सावंतवाडी दि.२४-:* कुडाळ नगरपरिषदेतील एका नगरसेवकाने मुख्याधिकार्यांना शिवीगाळ करून हल्ला केल्याप्रकरणी आज सावंतवाडी नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी व मुख्याधिकारी यांनी काळी फीत लावून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी त्या नगरसेवकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच यावेळी जिल्ह्याच्या संघटनेमार्फत निवेदन देखील देण्यात आले आहे.
