आंबोली गावढणवाडी, सतीचीवाडीतील नागरिक जखमी: भीतीचे वातावरण
*💫आंबोली दि.२४ विष्णू चव्हाण -:* तालुक्यातील आंबोली येथे कोळसुंदा या प्राण्याने काही ग्रामस्थांवर प्राणघातक हल्ला करून जखमी केले आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गावढणवाडी, सतिचीवाडी येथील नागरिकांना जबर जखमी केले आहे.
या हल्ल्यात ६ जण जखमी झाले आहेत. यात एक महिलेचा देखील समावेश आहे. अशोक जाधव, रामा जाधव, बाळकृष्ण जाधव, यशवंतराव जाधव, राधाबाई धुरी, नंदकुमार गावडे अशी जख्मी झालेल्या नागरिकांची नावे आहेत. हि घटना काल मध्यरात्री आणि सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताचघटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले असून, त्या प्राण्याची शोधमोहीम करत आहेत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य काशिराम राऊत, ग्रामपंचायत सदस्य निधी गुरव, शिवाजी गावडे यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे.
