कुणकेरी गावात विरनोडकर टिमकडून कोरोना बाधित घरात निरजंतुकीकरण

*💫सावंतवाडी दि.२२-:* कुणकेरी गावात नागरिक कोरोना बाधित आढळल्याने या गावात यापूर्वी देखील एक व्यक्ती कोरोनाच्या बाधेमुळे मयत झाली होती. त्यामुळे गावात पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे गावच्या ग्रामसेविका सौ.मोरये यांनी संजू विरनोडकर यांना संपर्क करून कोरोना बाधित क्षेत्रात असणाऱ्या रुग्णांच्या घरात निर्जंतुकीकरण करण्याची विनंती केली. यावेळी संजू विरनोडकर टिमने कुणकेरी गावात येऊन कोरोना बाधित असणाऱ्या नागरिकांच्या पुर्ण घरात सॅनिटईज करून निरजंतुकीकरण केले. खरेतर या भागात गाड्या देखील जात नव्हत्या. तरी देखील संजू विरनोडकर टिंम ने त्या ठिकाणी जाऊन निर्जंतुकीकरण केले आहे. यावेळी संतोष तळवणेकर, सागर माळगावकर सहभाग घेतला या वेळी कुणकेरी सरपंच विश्राम सावंत, ग्रामसेविका सौ.मोरये आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या टिंमच्या सेवाभावी कार्याबद्दल कुणकेरी गावातील नागरिकांनी व सरपंच विश्राम सावंत यांनी धन्यवाद देत आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page