⚡मालवण ता.०४-: विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाच्या संकल्पनेतून साकार झालेली ऑनलाइन विज्ञान प्राविण्य स्पर्धा परीक्षेत जिल्हाभरातून प्रविष्ठ झालेल्या १२१३ विद्यार्थ्यांपैकी १०७७ विदयार्थ्यांनी यश मिळविले यात १६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली
सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाच्यावतीने यावर्षी प्रथमच ऑनलाइन विज्ञान प्राविण्य स्पर्धा घेण्यात आली या उपक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी आणि डाएटचे प्राचार्य श्री. राजेंद्र कांबळे यांनी जिल्ह्यातील शाळांना विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला या परीक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २५९ एव्हढी आहे.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १०७७ विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षापासून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे, असे विज्ञान मंडळाने जाहीर केले आहे. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे सचिव आणि वराडकर हायस्कूल कट्टाचे विज्ञान प्रमुळं श्री. प्रकाश कानूरकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला मूर्त स्वरूप आले. तसेच श्री. आर. के. कारेकर, श्री. सत्यपाल लाडगांवकर, श्री. मिलिंद गांवकर, श्री. पृथ्वीराज बर्डे, एम. आर. पाटील, संजय शेवाळे, संदीप तुळसकर आणि संतोष पवार सर यांनीही विशेष मेहनत घेतली.
यासोबत मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी उत्तम साथ दिली. तसेच सी. जी. चव्हाण, सतीशकुमार कर्ले आणि राजाराम फरजंद यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. काकतकर सर यांनी नवीन तरुणांच्या प्रयत्नांना पाठींबा दर्शवित अशाच प्रकारे भविष्यात याहून मोठी जबाबदारी तरुणांनी पार पाडावी अशी आशा व्यक्त केली.
तर या विज्ञान प्राविण्य स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण झाली असून, जिल्ह्यातील पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे भविष्यात ही स्पर्धा अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा मानस विज्ञान मंडळाने व्यक्त केला आहे.
