मालवण दि प्रतीनिधी
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत देवबाग मधील अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ.दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबागच्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी कुमार गंधार दत्तप्रसाद तेंडोलकर याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नववा तर मालवण तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला त्याची गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यास शिक्षिका श्रीमती प्रियांका मेस्त्री (पाटणे) मॅडम श्री. गोसावी सर तसेच पालकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.रचना रुपेश खोबरेकर प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर, सर्व संस्था पदाधिकारी आणि सदस्य, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले आहे.
