वेंगुर्ल्यात तीन पत्ती जुगारावर पोलिसांचा छापा !

रोख रकमेसह नऊ जणांना घेतले ताब्यात

*💫वेंगुर्ला दि.२२-:*  शहरातील सुंदर भाटले एसटी स्टँड नजीक च्या झुडपांमध्ये तीन पत्ती जुगारावर दुपारी वेंगुर्ला पोलिसांनी छापा टाकला. त्यात 2,500 रुपयांचा मुद्देमाला सह 9 जणांना ताब्यात घेतले आहे.         घटनास्थळी तीन पत्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पालकर, सुरेश पाटील, गौरव परब यांच्या तुकडीने 21 एप्रिल दुपारी 2 वाजता छापा टाकला. यात तीन पत्ती जुगार साहित्य व रोख रक्कम 2,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page