अर्धवट माहितीच्या आधारावर भगवान गवस यानी आरोप करु नये..

भाजपच्या दीपक गवस यांचा पलटवार;तालूका प्रमुखांची हुजरेगिरी करण्याआधी वस्तुस्थिती जाणून घेण्याचाही दिला सल्ला

*💫दोडामार्ग-:*   युवासेना उप तालुका प्रमुख असे पदनाम लावून शिवसेना तालुका प्रमुखाची हुजरेगिरी करणाऱ्या भगवान गवस यांनी आम्हाला आत्मपरिक्षणाचा सल्ला देण्यापूर्वी स्वतः आधी अभ्यास करावा आसा जोरदार पलटवार भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दिपक गवस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. 

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने थांबविण्यात आले होते. यावेळी कार्यकारी अभियंता यांनी देखील पाहणी केल्यानंतर हे काम निकृष्ट व दर्जाहीन असल्याचे सागितले होते. तरी देखील सत्ताधारी शिवसेना गप्प बसते याचे नेमके गौडबंगाल काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे भाजप वर टीका करून आपल्या तालुका प्रमुखांना खुश करू नये असा टोला देखील लगावला आहे.

You cannot copy content of this page