कणकवली : कसालहुन कणकवली च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पल्सर मोटरसायकलची रोड डिव्हायडर ला धडक बसून झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जखमी झाला. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ओसरगाव तलावासमोर हा अपघात घडला. कणकवली च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील पल्सर मोटरसायकलस्वाराचे नियंत्रण सुटून मोटरसायकल हायवे रोड डिव्हायडर ला आपटली. अपघातानंतर मोटरसायकलस्वार रोड डिव्हायडर च्या पॅसेजमध्ये पडला होता. हायवेने प्रवास करणारे कणकवली नगरपंचायत चे नगरसेवक सुशांत नाईक, शासकीय ठेकेदार अनिस नाईक, स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ अपघातग्रस्त जखमी चालकाला मदत केली.हायवे पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ ऍम्ब्युलन्स मागवून नगरसेवक सुशांत नाईक, अनिस नाईक , हायवे पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी जखमी चालकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले.
ओसरगाव येथील डीव्हायडरला आपटून दुचाकी चालक जखमी..
