तालूकाप्रमुख हरी खोबरेकर यानी केले अभिनंदन
मालवण, दि प्रतिनिधी वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विरेश ऊर्फ नाना नाईक यांची आज बिनविरोध निवड झाली. वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी आज निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यात विरेश नाईक यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून नाईक यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच भाई ढोके, उपसरपंच संदेश तळगावकर, माजी उपसरपंच श्याम झाड, शिवसेना विभागप्रमुख प्रवीण लुडबे, महिला विभागप्रमुख प्रियांका रेवंडकर, प्रवीण रेवंडकर, माजी सरपंच भगवान लुडबे, प्रदीप वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य कविता मोंडकर, मनोज झाड, माधुरी खोबरेकर, चिंतामणी मयेकर, महादेव भगत, ग्रामपंचायत कर्मचारी अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच श्री. नाईक म्हणाले, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन गावचा सर्वांगीण विकास साधू. यासाठी सर्वांनी आपल्याला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. फोटो वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झालेल्या विरेश नाईक यांचे अभिनंदन करताना जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर सोबत सरपंच भाई ढोके, संदेश तळगावकर, माजी उपसरपंच श्याम झाड व इतर
