देवली येथे वाळूचा डंपर पकडला…

मंडल अधिकारी निपाणीकर, तपाठी शिंगरे यांची कारवाई

*💫मालवण दि.२२-:* देवली सागरी मार्गावर येथे अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर (एमएच ०७ १५०५) कारवाई करत ताब्यात घेतला आहे. मालवण मंडळ अधिकारी आर. व्ही. निपाणीकर व तलाठी दीपक शिंगरे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी डंपरमालक रवि डांगी रा. कसाल याला महसूल प्रशासनाने नोटीस बजावली आहे. गुरुवारी दुपारी डंपरचालक अनिल चव्हाण हा कुंभारमाठ देवली सागरी महामार्गावरुन डंपरमधून वाळूची वाहतूक करत होता. मंडळ अधिकारी रविंद्र निपाणीकर, देवली तलाठी डि.बी.शिंग्रे यांनी सदरचा डंपर थांबवून डंपरची तपासणी केली असता डंपरमध्ये तीन ब्रास वाळू सापडली. त्यामुळे महसूल प्रशासनाने सदरचा डंपर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात उभा केला आहे.

You cannot copy content of this page