नगरसेवक गणेश भोगटे यांना अखेर अटक..

कुडाळ मुख्याधिकारी नितिन गाढवे यानी केलेली पोलिसांत तक्रार;शासकीय कामात अडथळा आणत केली शिविगाळ

कुडाळ : शासकीय कर्तव्य बजावत असताना नगरसेवक गणेश अनंत भोगटे रा. कुडाळ याने आपल्या केबीनमध्ये येऊन आपल्याला शिवीगाळी करून खुर्ची उचलून मारण्यासाठी उगारली तसेच आपल्याला शासकीय काम करीत असताना अटकाव जीवे मारण्याची धमकी दिली.समोरील कोबीड शिल्ड उचकटून काढून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले व आपण तक्रार देण्यास पोलीस स्टेशनला जाण्यास बाहेर पडत असताना आपल्याला दरवाजात अडवून बाहेर जाण्यास प्रतिबंध केला अशी तक्रार कुडाळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी नगरसेवक गणेश अनंत भोगटे रा. कुडाळ यांच्याविरुध्द कुडाळ पोलिसात दिली आहे.यानुसार नगरसेवक गणेश भोगटे यांच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. कुडाळ नगरपंचायत अंतर्गत केळबाई वार्ड क्र. १० चे नगरसेवक म्हणून गणेश अनंत भोगटे हे कामकाज पहात आहेत. या वार्डमधील शिवाजी पार्क येथील पाण्याचे ओव्होळामध्ये अतिक्रमण झाल्याबाबतची तक्रार संबंधीत बार्डचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी नगरपंचायत कार्यालयात केलेली होती. त्यामुळे सदर वार्डमधील शिवाजी पार्क मधील एका क्षेत्राची मोजणी करण्याचा प्रस्ताव दिनांक ०५ एप्रिल २०२१ रोजी नगरपंचायत कार्यालयाकडून भूमी अभिलेख कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला होता. त्या क्षेत्रामधील एकुण ०९ ( सर्वे नं. २१५/१ ते २१५/७, २२१/६, २२१/७ ) सर्वे नंबरची मोजणी करुन घेण्याचे प्रस्तावीत होते. त्याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाकडून या प्रस्तावास दिनांक ०७ एप्रिल २०२१ रोजी मंजूरी प्राप्त झालेली होती. परंतू त्या सव्हे व्यतिरीक्त लगतच्या इतर सव्हे नंबर क्षेत्राची मोजणी करणे आवश्यक वाटत असल्याने फेरप्रस्ताव सादर करून आम्ही संपुर्ण प्रस्तावास मंजूरी येईपर्यंत सुरुवातीस प्राप्त झालेल्या सव्हे नंबरचे मोजणीचे पैसे भरण्याची कार्यवाही केलेली नव्हती. तसेच सद्य स्थितीत नगरपंचायत कोव्हीड अनुशंगाने कामात व्यस्त असल्याने सदर कार्यवाहीकरीता थोडा उशीर झालेला होता.दिनांक २२ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १०.४५ वा. पासून मुख्याधिकारी श्री गाढवे हे नगरपंचायत कार्यालयात आपल्या केबीनमध्ये त्यांची शासकीय कर्तव्य बजावत होते. दुपारी १२.०५ वा. चे सुमारास केळबाई वार्ड क्र. १० चे नगरसेवक गणेश भोगटे हे श्री गाढवे यांच्या केबीनमध्ये आले व शिवाजी पार्क मधील सर्व्हे नंबरचे मोजणी बाबतचे पत्र तुम्हाला प्राप्त असूनही तुम्ही त्याचे पैसे भरून मोजणीची कार्यवाही का करीत नाही? अशी विचारणा करु लागले त्यावेळी श्री गाढवे यांनी त्यांना सांगितले की, आम्ही सादर केलेल्या प्रस्तावातील सव्हे नंबर व्यतिरीक्त त्या लगत असलेल्या इतर सर्वे नंबरची देखील मोजणी करण्याकरीता फेरप्रस्ताव सादर करणार आहोत. मंजूरी प्राप्त सर्व्हे नंबरचीच मोजणी करुन घेतल्यास फक्त काही गट धारकांना जाणीवपूर्वक लक्ष केल्यासारखे होईल. आपण सर्व २० ते २५ सर्व्हे नंबरचा फेरप्रस्ताव पाठवून त्याप्रमाणे मंजूरी घेऊन मोजणीचे पैसे भरुन पुढील कार्यवाही करुया, असे समजावून सांगत असताना त्यांनी श्री गाढवे यांना एकेरी भाषेत “मादरचोद” अशी शिवीगाळी केली व “माझा आता कालावधी संपत आहे,” “तुम्ही मला फसवताय,” असे बोलून माझ्या केबीनमधील समोरील स्टीलची खुर्ची उचलून श्री गाढवे यांच्यावर मारण्यासाठी उगारली व त्याठिकाणी श्री गाढवे यांच्या समोर सुरक्षीततेसाठी लावलेली प्लॅस्टीकची कोव्हीशिल्ड त्याचे रॉडसहीत उचकटून काढली. व “तुला आज मारुनच टाकतो,” अशी धमकी दिली. त्यावेळी नगरपंचायत कार्यालयीन स्टाफ लेखापाल स्वप्नील पाटील, लिपीक प्रसाद नाईक, शिपाई कुंभार वगैरे केबीनजवळ येऊन दरवाजा उघडला. त्यावेळी देखील गणेश भोगटे याने पुन्हा तेथील खुर्ची उचलून श्री गाढवे यांच्यावर मारण्यासाठी उगारली, त्याचवेळी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी श्री गाढवे यांच्या केबीनमध्ये येऊन गणेश भोगटे यांना बाहेर घेऊन गेले. त्यावेळी बाहेर जाताना गणेश भोगटे याने “मी सीओला सोडणार नाही,” असे ओरडून बोलत बाहेर गेला.त्यानंतर नगरपंचायत कार्यालयाचे अधीक्षक सुरेल परब व नगराध्यक्ष ओंकार तेली श्री गाढवे यांच्या केबीनमध्ये आले व श्री गाढवे यांच्याकडे नक्की काय प्रकार घडला याबाबत विचारपूस केली . त्यावेळी श्री गाढवे हे श्री तेली यांच्याशी चर्चा करुन ते पोलीस तक्रार देण्याकरीता केबीनमधून बाहेर पडले .त्यावेळी गणेश भोगटे नगराध्यक्षांचे केबीनमध्ये बसून होते. त्यांनी श्री गाढवे बाहेर पडलेले पाहून नगराध्यक्ष यांच्या केबीनमधून बाहेर येऊन श्री गाढवे यांना दरवाजात अडवून “मला उत्तर दिल्याशिवाय इथून बाहेर पडायचे नाही,” असे सांगून श्री गाढवे यांना अडवून धरले. त्यानंतर नगरपंचायतचे कार्यालयीन कर्मचारी संदीप कोरंगावकर यांनी गणेश भोगटे यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतू ते एकण्याचे मन

You cannot copy content of this page