आर टी पी सी आर टेस्ट अहवाल लवकर मिळावेत यासाठी उपाययोजना करा..

*मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांची तहसीलदार म्हात्रे यांच्याकडे मागणी*

सावंतवाडी येथील विश्रामगृह या ठिकाणी करण्यात येणाऱ्या आर टी पी सी आर टेस्टचे अहवाल येण्यास उशीर होत आहे. ही बाब गंभीर असून, यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे अहवाल लवकरात लवकर मिळावेत यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे. तसेच रस्त्यावर करण्यात येणाऱ्या रॅपिड टेस्ट मुळे विनाकारण रॅपिड टेस्ट किट खर्च केली जात आहे. सद्य स्थितीत आपणाकडे जास्त किट उपलब्ध नसल्याने ज्या ठिकाणी गरज आहे. त्याच ठिकाणी रॅपिड किट चा वापर करावा अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page