पोस्टल खाती उघडण्यात जिल्ह्यात देवगड प्रथम तर गोवा रिजनमध्ये द्वितीय…

चालू आर्थिक वर्षात देवगड पोस्टल उपविभाग नवीन खाते उघडण्यात प्रथम..

⚡देवगड ता.०१-:चालू आर्थिक वर्षात देवगड पोस्टल उपविभागात देवगड, कणकवली व वैभववाडी तालुक्यात गावागावात डाक मेळावे आयोजित करून देवगड उपविभाग बचत खाती उघडण्यासाठी जिल्हयात प्रथम क्रमांकावर आहे
तसेच गोवा रिजन मध्ये द्वितीय क्रमांकावर आहे.

           लाडकी बहीण योजनेसाठी उपविभागात एकूण ८९ पोस्ट ऑफिसमध्ये आठ हजारापेक्षा जास्त महिलांची शून्य रुपयात खाती उघडली गेली. तसेच प्रत्येक गावात पोस्ट ऑफिस असल्याने योजनेचा लाभ महिलांना घरबसल्या मिळू लागला आहे.

रिजन ऑफिसच्या लक्ष्य की और या मोहिमेमध्ये चालू महिन्यात ४ हजारापेक्षा जास्त खाती उघडून देवगड उपविभाग जिल्ह्यात प्रथम तर गोवा पोस्टल रिजन मध्ये द्वितीय क्रमांकावर असल्याचे डाक निरीक्षक श्री. श्रीराम वायाळ यांनी सांगितले. तसेच महिलांसाठी व शेतकऱ्यांसाठी शून्य रुपयाने बचत खाते उघडण्याचे आवाहन केले.

You cannot copy content of this page