सरपंच सुनील कांबळे यांनी भाजपात जाहीर प्रवेश..
⚡वैभववाडी ता.२८-: बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठा सेनेला जोरदार धक्का दिला आहे. कोळपे गावचे उबाठा सेनेचे सरपंच सुनील कांबळे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा प्रवेश पार पडला.
कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात एकमेव कोळपे ग्रामपंचायत उबाठा सेनेकडे होती. कोळपे सरपंच सुनील कांबळे यांनी गावच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. विकास केवळ पालकमंत्री नितेश राणे हेच करू शकतात. असा त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाप्रमुख नासिर रमदुल, युवासेना वैभववाडी प्रमुख श्री.पाटणकर यांनी देखील भाजपात प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे नामदार नितेश राणे यांनी स्वागत केले.
