वैभववाडीत रक्तदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद…

⚡वैभववाडी ता.२८-: रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व सिंधू रक्त मित्रं प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रक्तदान शिबीर संपन्न झाले एकूण ३० रक्तदाते रक्तदान केले

सदरहू शिबीर रोट्रियन्स नी यशस्वी केले या शिबिरात वैभववाडीतील प्राथमिक शिक्षकवृंद व आनंदीबाई रावराणे महाविद्यालय चे शिक्षक वृंद यांनी आवर्जून रक्तदान केले सदरहू शिबीर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब प्रेसिडेंट प्रशांत गुळेकर , डॉ नामदेव गवळी ,संजय रावराणे मुकुंद रावराणे विद्याधर सावंत सेक्रेटरी सचिन रावराणे तसेच राजेश पडवळ, दिनकर केळकर राजेंद्र पाटील अनंत फोंडके केंद्रप्रमुख जाधव आदी उपस्थित होते.
शिबिरा मध्ये प्रेसिडेंट प्रशांत गुळेकर यांनी ४० व्या वेळा तर सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेश पडवळ यांनी २८ व्या वेळी रक्तदान केले तसेच रोटरी वैभववाडी चे माजी अध्यक्ष व सिंधू रक्त मित्रं प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष श्री संजय रावराणे 31 वेळा केले या बद्दल रोटरी क्लब ऑफ प्रेसिडेंट यांनी अभिनंदन केले तसेच ओरस ब्लड बँक चे सहकार्य मिळाले.

You cannot copy content of this page