⚡मालवण ता.२८-:
मालवण धुरीवाडा (कुरण) येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा बुधवार दि. ५ मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी अभिषेक, पूजन, नामस्मरण आणि श्रीभक्त श्री. विनायक खानोलकर व सौ. विद्या खानोलकर यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. दुपारी १ ते ४ यावेळेत महाप्रसाद, दुपारी १ वाजल्या पासून तीर्थप्रसाद तसेच दुपारनंतर त्रिमूर्ती भक्तिसंगम, मालवण यांचे सुश्राव्य गायन, आणि श्री सद्गुरु संदानंद माऊली संप्रदाय भजन मंडळ, वायरी, मालवण यांचे भजन सादर होणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकरी – धामापूरकर कुटुंबीय यांनी केले आहे.
