जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरीत भरा…

४९४ पैकी १२९ पदे रिक्त;अध्यक्षा संजना सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यातील मंजूर वैदिकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी पयवेकक्षक सह 129 रिक्त पदे असताना 494 कर्मचारी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा गाडा हाकत आहेत कोरोणाचा या महामारी संकटात राज्य शासनाने 129 रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि प्रधान सचिवांकडे केली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोणा चे वाढते संकट असून आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे जिल्ह्यात प्रजनन आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यां सह 21 वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण 1 ,जिल्हा प्रशासन अधिकारी 1, सांख्यिकी अधिकारी 1, अशी 29 पदे रिक्त असून जिल्हा परिषद वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांमध्ये परिचारिका आरोग्य पर्यवेक्षक 18 वैद्यकीय अधिकारी 7, औषध निर्माता 9,आरोग्य सेवक पुरुष 48 ,महिला 49, आरोग्य सहाय्यक 3,आरोग्य सहायक महिला 11, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1, प्रोजेक्ट निषट1, अशी 129 पदे रिक्त असून सध्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा गाडा 494 कर्मचारी अधिकारी हाकत आहेत. जिल्ह्यात 38 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असून सध्या कोरोणा महामारी मुळे वाढते रुग्ण संख्या याशिवाय अन्य आजारांचे रुग्ण तसेच लहान बालकांचे लसीकरण कार्यक्रम आणि सध्या सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोरोना लसीकरण कार्यक्रम त्याचा अतिरिक्त ताण या वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर पडत आहे राज्य शासनाने या रिक्त पदांची भरती तातडीने करावी कंत्राटी पद्धतीने का होईना या पदांची भरती करून या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी जिप अध्यक्ष संजना सावंत यांनी केली आहे . जिल्ह्यात कोरोणा ची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोणा बरोबर अन्य आजारामुळे रुग्ण संख्या ही कमी जास्त प्रमाणात आहे लसीकरण व डायबिटीस इतर आजाराने असलेल्या रुग्णांचे संखेत काही जणांचा मृत्यू ओढवला आहे त्यामुळे मृत्युची संख्याही सिंधुदुर्गात कमीजास्त प्रमाणात वाढत आहे. या एकूण आरोग्य सेवेचा कमी-जास्त प्रमाणात ताण उपलब्ध आरोग्य अधिकारी कर्मचारी वर्गावर पडत आहे ,गेली अनेक वर्षे या रिक्त पदांच्या भरतीबाबत सातत्याने मागणी होत असून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा ,आरोग्य समिती सभा यामधूनही त्यात रिक्त पदांचा आढावा मध्ये जि प सदस्या तुन मागणी सातत्याने होताना दिसत आहे तरी शासनाने तातडीने कंत्राटी पद्धतीने तरी ही रिक्त पदे भरावी अशी मागणी शासनाकडे केली असल्याचे सांगत यावर तातडीने शासनाने दखल घ्यावी अशी मागणी जिप अध्यक्षा संजना सावंत त्याने केली आहे .

You cannot copy content of this page