तब्बल १५ रुग्णाचे निधन:नवीन २३७ बाधित:११० मुक्त
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 619 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 889 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 237 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तब्बल १५ रुग्णाचे निधन झाले आहे. तर ११० रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
