*💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविडची १० हजार लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा जिल्ह्यात ठप्प झालेले कोविड चे लसीकरण वेगाने सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान १० हजार लस उपलब्ध झाली तरी,शासनाकडून तातडीने अजूनही आणखी लसीचा साठा उपलब्ध होण्याची गरज आहे.गेले दोन दिवस जिल्ह्यातील कोविड लसीकरण केंद्रावरील लसीचा साठा संपल्याने जिल्ह्यातील कोविडचे लसीकरण ठप्प झाले होते.मात्र याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर आज जिल्ह्यासाठी १० हजार कोविसील्ड ची लस उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील ५६ लसीकरण केंद्रावर या लसीचे वितरणही करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांनी दिली. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आदी ठिकाणी कोविड चे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत.आता लस उपलब्ध झाल्यानें लसीकरण केंद्रावर उद्यापासून पुन्हा एकदा नव्या जोमाने लसीकरणास सुरुवात होणार असून, जिल्ह्यातील लसीकरणास पात्र असलेल्या लाभार्थी नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्याला १० हजार कोविड लस उपलब्ध..
