निरवडेत आढळला मृत गवारेडा…

*💫सावंतवाडी दि२२-:* निरवडे धनगर वाडी येथे वस्तीपासून शंभर मीटरवरील जंगलात मृत गवारेड आढळून आला. दोन गव्याच्या झुंजीत तो मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे, घटनास्थळी उपसरपंच चंद्रकात गावडे, ग्रा.पण सदस्य अर्जुन पेडणेकर तसेच संतोष गावडे यांनी देत वनविभागाला पाचारण केले. निरवडे तसेच आजुबाजुच्या गावात गवारेड्याचा वापर मोठ्या प्रमाणात आहे, येथील शेतकऱ्याच्या शेतीबागायतीचे नुकसान मोठ्याप्रमाणात या जंगली प्राण्यांकडून केले जाते, आज सकाळी धनगरवाडी येथील ग्रामस्थांना वस्तिलगतच्या जंगलात मृत गवारेडा दिसुन आला. सदर गव्याचा मृत्यू हा झुंजीमुळे झाल्याचे दिसून येत आहेत. तसेच दोन दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे, निरवडे उपसरपंच श्री गावडे,सदस्य पेडणेकर यांनी घटनास्थळी जावुन पाहणी करत तात्काळ याबाबतची खबर वनविभागाला दिली.

You cannot copy content of this page