दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय दुरुस्तीचे काम बंद पाडण्याचा भाजपाचा घाट.

टक्केवारिवर सेना चालत नाही:युवासेना उपतालुकाप्रमुख भगवान गवस यांचा पलटवार

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी आमदार दिपक केसरकर हे मंत्री असताना निधी मंजूर झाला होता. त्याचे काम आता सुरू झाल्यानंतर ते काम अडवण्यासाठी काही लोकांनी थयथयाट केला, ही लोकं कुठच्या पक्षाची होती हे सर्व तालुकवासीयांना माहिती आहे. जर खरोखरच निकृष्ट दर्जाचे काम होत असेल तर आपण त्या यंत्रणे मार्फत थांबवू शकता मात्र तसे न करता केवळहोत असलेल्या विकास खो घालण्यासाठी ती बंद पाडण्याचा घाट भाजपा मार्फत घातला जात असल्याचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे युवासेना उपतालुकाप्रमुख भगवान गवस यांनी पलटवार केला आहे. झालेले काम जर खरोखरच निकृष्ट दर्जाचे असेल आणि त्याची गुणवत्ता खराब असेल तर ती ठरवण्यासाठी संबंधित यंत्रणा आहे, ते काम बरे की वाईट हे कोणी असेच ठरवू शकत नाही असे सांगताना गवस यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, टक्केवारीवर शिवसेना चालत नाही, शिवसेना विकास कामे आणते. टक्केवारीवर कोण चालतो हे सर्व जनतेला ज्ञात आहे त्यामुळे असले बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी भाजपा तालुकाध्यक्ष यांनी अभ्यास करावा असा पलटवार भगवान गवस यांनी केला आहे.

You cannot copy content of this page