कणकवली भाजपा अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी लगावला टोला
*कणकवली (प्रतिनिधी)* : ‘भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आमच्या नेत्यांना कोण भेटत असेल आणि त्यामुळे आमचा पक्ष मजबूत होत असेल, तर त्याचं स्वागतच आहे’, अशा शब्दांत कणकवली भाजपा अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी टोला लगावला आहे. कालच्या भेटीबद्दल अजून कोणीही माहिती देण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर त्याला पळता भूई थोडी होईल अशी सूचना त्यांनी केलीय. ‘भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज सेवा कार्यात व्यस्त असल्यामुळे आम्ही राजकारण करू इच्छित नाही’, असे त्यांनी सांगितले आहे.
