दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू

गरजू व वयस्कर लोकांना केंद्रावर जाण्यासाठी चेतन चव्हाण मित्रमंडळ दोडामार्ग तर्फे वाहनाची सोय

*दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक व्हेक्सींनचे लसीकरण सुरू असून सध्या वय वर्षे ४५ पूर्ण झालेल्या नागरिकांना हे व्हेक्सीन देण्यात येत आहे, मात्र काही गरजू , अपंग ज्यांच्याकडे लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी वाहन उपलब्ध नाही ते या लसीकरणापासून वंचित आहेत. गरजू व वयस्कर लोकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी चेतन चव्हाण मित्रमंडळ दोडामार्ग तर्फे वाहनाची सोय केली असून याचा लाभ घेण्यासाठी चेतन चव्हाण, 094233 13741 समीर रेडकर 094224 85212, लक्ष्मण (पिकी) कवठणकर 090755 58292 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page