बांदा परिसरात आज एकही कोरोना बाधित रुग्ण नाही…

डॉ. जगदीश पाटील : बंद यशस्वी झाल्याची सरपंच अक्रम खान यांची प्रतिक्रीया

*💫बांदा दि.२१-:* बांदा शहर व परिसरात आज एकही कोरोना बाधित रुग्ण न मिळाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. बांदा शहरात मंगळवारी 100 टक्के बंद पाळण्यात आल्याने हा बंद यशस्वी झाल्याचे सरपंच अक्रम खान यांनी सांगितले. गेल्या ४ दिवसात बांदा परिसरात कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. त्यामुळे मंगळवारी संपूर्ण बाजारपेठ १०० टक्के बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत, पोलीस, आरोग्य प्रशासन व व्यापारी संघाने घेतला होता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बांदावासीयांनी एकजूट दाखविली. त्यामुळे आज एकही बाधित रुग्ण सापडला नाही.

You cannot copy content of this page