रोटरी क्लब ऑफ़ मॅंगो सिटी देवगडच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

देवगड रोटरी क्लब ऑफ़ मॅंगो सिटी देवगडच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४५ हुन अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला. केले या रक्तदान शिबिराचे उदघाटन अध्यक्ष रो.मनस्वी घारे यांच्या हस्ते रो. उमेश पाटील तालुका आरोग्य अधिकारी देवगड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सचिव रो. गौरव पारकर रो.नरेश डांमरी रो .दयानंद पाटील, रो.प्रवीण पोकळे, रो.विजय बांदिवडेकर, रक्तपेढीचे अभिजीत इंगे प्रांजली परब ,नेहा परब,कांचन शिंदे,श्री आडकर गावकर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल कोरगावकर आणि आभार दयानंद पाटील यांनी मानले.या रक्तदान शिबिरात तृप्ती अमर तोडणकर यांनी सहभाग घेतला.

You cannot copy content of this page